गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरियाणा मध्ये कोरडे हवामान चालू होते. खरं तर, कोणतीही महत्वपूर्ण हवामान परिस्थितीच्या अनुपस्थितीमुळे, मागील दोन दिवसांपासून या भागांवर उत्तर पश्चिम दिशेने वारे वाहत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता असा दिसून येत आहे कि येणाऱ्या दिवसात पंजाब आणि हरियाणाच्या दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ दिसून येईल. याशिवाय, हरियाणामधील काही भाग जसे हिसार आणि सिरसा, येथे उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल व पारा ४५ अंश सेल्सिअस पर्येन्त पोहोचेल.
Also read in English: Pre-Monsoon rains to commence in Punjab and Haryana around May 10
स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या दोन दिवसात, पंजाब आणि हरियाणाच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून येईल. त्यानंतर, हवामानाची परिस्थिती बदलेल आणि आर्द्रता वाढेल व पूर्व मान्सून गतिविधींची सुरवात होईल.
१० मे च्या आसपास पंजाब आणि हरियाणामधील एक दोन ठिकाणी हलका पाऊस पडेल. ११ मे पासून पावसाचा जोर वाढेल व आमची अशी अपेक्षा आहे कि पंजाब आणि हरियाणामधील आणखीन काही भाग पाऊस अनुभवतील.
विखुलेल्या पावसाची सुरुवात दुपारी किंवा संध्याकाळ पासून दोन्ही राज्यांवर होईल.
पूर्व मान्सूनचा पाऊस १० मे पासून १६ मे पर्येन्त चालेल व पावसाचा जोर सगळ्यात जास्त १३ व १४ मे ला राहील. या काळी, एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडू शकतो.
या शिवाय, तापमानात पण लक्षणीय घट दिसून येईल आणि उत्तर भारतातील रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून काही काळ सुटका मिळेल.
पूर्व मॉन्सूनच्या पावसा नंतर दोन्ही राज्यांवर पावसाची कमतरता कमी होईल.
प्रतिमा क्रेडीट: पिंटेरेस्ट
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे