दक्षिण भारतात गेले चार दिवस सतत सुरु असलेल्या पावसाने आता थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. हा पाऊस जरी ओसरला असला तरी हे नैऋत्य मान्सूनच्या सुरळीत होणाऱ्या आगमनाचे संकेत आहे.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी किनारपट्टीकडील दोन्ही बाजूला असलेल्या हवामान प्रणालींची तीव्रता आता कमी झाली आहे आणि म्हणूनच पावसाचा जोर कमी झालेला असून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकाचा आतील भागात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस येतच राहील.
बंगालच्या उपसागरावर जे चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झाले होते ते आता तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून पुढे आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकले आहे आणि पुढे मात्र हे चक्रवाती हवेचे क्षेत्र किनारपट्टीपासून लांब जाईल.
याच दरम्यान लक्षद्वीप आणि त्या लगत असलेल्या केरळात चक्रवाती हवेचे अभिसरण सुरु होते त्याचीही तीव्रता कमी होईल.
स्कायमेट या हवामान संस्थेने नुकत्याच दिलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार अजून नवीन प्रणाली तयार होत असून तिचा परिणाम येत्या ३ ते ४ दिवसात पुन्हा येणाऱ्या पावसाच्या स्वरुपात होईल.
मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत दक्षिण भारतात गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
या सर्व हवामानातील बदलांमुळे दक्षिण भारतातील जनता आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेत आहेत कारण सध्या तेथील कमाल तापमान ३० अंश से. पेक्षा कमीच आहे आणि किमान तापमान २० अंश से. पेक्षा कमीच राहते.
पण जसजसा या पावसाचा जोर कमी होईल तसतसा दिवस व रात्रीच्या तापमानातही वाढ होईल आणि यामुळे आर्द्रताही वाढेल आणि यामुळे वातावरण थोडेसे असह्य होईल. तरीही मान्सूनचा लवकरच येणारा पाऊस यात फारशी वाढ होऊ देणार नाही.
सद्यस्थितीत, असलेल्या हवामानाचा आढावा घेतल्यास नैऋत्य मान्सूनचे केरळात लवकरच आगमन होईल. सध्या मान्सूनची हजेरी अंदमान निकोबारला लागलेली आहे आणि पाऊस लवकरच श्रीलंकेला येऊन पोहचेल.
Image credit: www.globalexcursionindia.com