[Marathi] वातावरणात मान्सूनपूर्व बदलला सुरवात

May 11, 2015 4:55 PM | Skymet Weather Team
भारतात बऱ्याच ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे व वादळी पावसामुळे हवामानात मान्सूनपूर्व होणारे बदल दिसून येत आहेत. भारतात थिरूवनंतपुरम पासून थेट दिल्लीपर्यंत बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावलेली दिसून आली. तसेच या मान्सूनपूर्व वातावरणातील बदल वेगात होतील व त्यामुळे पुढचे दोन दिवस तरी देशात ठिकठिकाणी संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात मात्र हा पाऊस दिवसभर येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे आणि मान्सूनपूर्व हालचालींमुळे वाढत्या तापमानात घट नक्कीच होणार आहे.
गंगेच्या खोऱ्यालगतच्या भागातील मान्सूनपूर्व हालचाली
उत्तर भारतातील पंजाब, हरयाणा आणि दिल्ली एनसीआर या भागांवर चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झालेले असून पश्चिम बंगालच्या गंगेचे खोरे ते बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल पर्यंत या क्षेत्राचा परिणाम होणे अपेक्षित आहे. तसेच अजूनही एका चक्रवाती हवेची प्रणाली या भागावर निर्माण झालेली दिसून आली आहे. पश्चिम राजस्थानावरही चक्रवाती हवेची क्षेत्र निर्माण झालेले आहे. या सर्व प्रणालींमुळे एक कमी दाबाच्या हवेचा पट्टा निर्माण झालेला असून यामुळे मान्सूनपूर्व वातावरणातील बदल या भागात वेगाने होताना दिसतील.
दक्षिण भारतातील मान्सूनपूर्व हालचाली
दक्षिण भारतातही तमिळनाडूतील सागरी किनारपट्टी जवळ चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झालेले  असल्याने पुढील काही दिवस यामुळे वातावरणात सततचे बदल होताना दिसतील. सद्यस्थितीत हे चक्रवाती क्षेत्र तमिळनाडूतील सागरी किनारपट्टीपासून उत्तरेकडे  सरकताना दिसून आले आहे. तसेच मान्सूनपूर्व वातावरणातील बदल हे केरळ, आंध्रप्रदेशातील दक्षिणेकडील सागरी किनारपट्टी आणि तामिळनाडू येथे होताना दिसतील.
भारताच्या दक्षिणेतील द्वीपकल्पावरील हवेतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनपूर्व होणाऱ्या वातावरणातील बदलांमध्ये अजूनच भर पडेल. या प्रणालींचा  परिणाम तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि मध्य महाराष्ट्र या भागांवर होताना दिसेल.
पूर्व आणि मध्य भारतातील मान्सूनपूर्व हालचाली
ओडिशा आणि छत्तीसगड व या लगतचे भाग म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा येथेही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले दिसून आले आणि यामुळे पूर्व आणि मध्य भारतात वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. देशातील इतर भागात मान्सूनपूर्व  हालचाली होत असताना गुजरात आणि मध्यप्रदेशात मात्र याची तीव्रता फारशी नसल्याचे दिसून आले.
Image credit: www.campusghanta.com

OTHER LATEST STORIES