स्काइमेट हवामानाच्या दिलेल्या अंदाजाप्रमाणे, दीर्घ कोरड्या कालावधीनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण विभागाच्या काही भागात काल चांगला पाऊस झाला .गुरुवारी रात्री ८. ३०वाजल्यापासुन २४ तासांत सांगलीमध्ये ३२ मिमी पाऊस पडला, तर कोल्हापूरमध्ये १६ मिमी पावसाची नोंद झाली. वेंगुर्ला येथे १४. २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हा पाऊस कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे होत आहे ज्यामुळे वारे उत्तरेकडील कर्नाटक पासून तामिळनाडू पर्यंत वाहत आहेत. तथापि, उष्माघाताने अद्याप राज्याला सुटका दिली नाही, कारण उष्णतेची लाट विदर्भाच्या अनेक भागात अजुनही मुक्काम ठोकून आहे.
चंद्रपूर आणि ब्रम्हपुरी येथे अनुक्रमे ४६ आणि ४४. ७ अंश एवढी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पण गुरुवारी, उष्णतेची लाट अगदी नागपूर, वर्धा, अकोला येथेही जाणवली ,कारण तेथीही कमाल तापमान ४५ अंशापर्यंत जाऊन स्थिरावले.
[yuzo_related]
शिवाय, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अति कमाल तापमानाची नोंदी झाली आहे . मालेगाव व जळगाव या ठिकाणीही कमाल तापमान ४४. ६ अंश नोंदवले गेले. कोकण विभाग फक्त असा आहे की जिथे अजुनही कमाल तापमानाची नोंद ही सामान्य तापमानाएवढीच होत आहे.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार उत्तर दक्षिण मोसमी वारे हे उत्तर राजस्तानकडून दक्षिण मध्य महाष्ट्राकडे वाहत आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात येत्या २४ तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे . त्यानंतर,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा हलकासा पाऊस होऊ शकतो. तसेच पुणे, नाशिक, सांगली, सातारा, वेंगुर्ला, कोल्हापूर येथेहि पाऊस होण्याची शक्यता आहे. तथापि, मुंबई-डहाणू येथील हवा कोरडीच राहील.
महाराष्ट्र कृषी पट्ट्यावर होणारा हवामानाचा होणारा परीणाम पाहु;
शेतकरी बंधूंना सल्ला आहे की ,त्यांनी उन्हाळी पिके काढणी पूर्ण करावी ,काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी . तसेच आंबा काढणी सुरू ठेवावी. शेतकरी बंधूनी खरीफ पेरणी साठी जमिनीची मशागत करण्यास सुरवात करावी व पीक कीड नियंत्रण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
Image Credit: holidify.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com