स्कायमेट हवामान ने दिलेल्या अंदाजानुसार सध्या विदर्भ आणि मराठवाड्यांच्या सर्व भागात गरम हवामानाची परिस्थिती आहे.
तशीच परिस्थिती विदर्भामध्ये पण अनुभवण्यात येत आहे. चंद्रपूर येथे बुधवारी ४५. ४ अंश एवढी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. दिवसाचे जास्तीत जास्त ४० अंश किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असेल तर उष्णतेची लहर आली असे जाहीर करतात.
किंवा तापमान सामान्य सरासरी पेक्षा ५ अंशाने वाढते तेंव्हापण उष्णता लहर आली असे म्हणतात .कोकण विभागाचे किनारपट्टीवरील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये उष्णतेचा अनुभव येत आहे .जवळजवळ सर्व विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांत कमाल तापमान ४० व ४० अंशापेक्षा जास्त नोंदविले जात आहे.
[yuzo_related]
बुधवारी, अकोला येथे कमाल तापमानाची ४४ अंश , परभणी ४३. ६ अंश , वर्धा ४३. ६ अंश , नागपूर ४३.१ अंश ,जळगाव ४३ अंश आणि मालेगाव ४२.१ अंश एवढी नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, यांच्या काही भागामध्ये विशेषतः, दक्षिणेकडील प्रदेश येथे ४० अंशापेक्षा जास्त तापमान असल्यामुळे हा भाग उष्णता लहरींचा साक्षीदार आहे.
दुसरीकडे, कोकणातील तापमान 30 अंशाजवळ स्थिर होत आहे ,तर उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ४०अंशापर्यंत स्थिर होत आहे . पुणे व सातारा येथे कमाल तापमानाची ३६. ३ अंश व ३८. ६ अंश , कोल्हापूर, सांगली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी येथे कमाल तापमानाची ३५. २ अंश अशी नोंद झाली.
म्हणून, जवळजवळ संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे,व पाऊसाची सध्या शक्यता नाही. तापमान जास्त म्हणजे ४० अंशापर्यंत राहील व महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधे जास्ती उष्णतेची परिस्थीती निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्र कृषी वर हवामानाचा होणारा परिणाम पाहु:
प्रचलित हवामान हे कीड व कीटकांचा उपद्रव होण्याकरिता अनुकूल आहे म्हणून शेतक-यांना कीटकांचा हल्ला टाळण्यासाठी योग्य सावधगिरी बाळगावी .तसेच शेतकरी बांधवाना सल्ला देण्यात येत आहे की , उन्हाळी पिके ,भाज्या आणि फळबागा यांना वारंवार सिंचन द्यावे. मराठवाड्यात, शेतकरी बंधुनी द्राक्षाची एप्रिल छाटणी चालू ठेवावी आणि केळ्याच्या झाडाला आणि नव्याने लागवड केलेल्या आंबाच्या वनस्पतींना आधार दयावा म्हणजे येणाऱ्या वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
Image Credit: HindustanTimes
येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे.