गेल्या दहा दिवसांपासून द्वीपकल्पाच्या आतील बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस कमीच होतो आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार रायलसीमा, कर्नाटकाचा उत्तरेकडील आतील भाग तसेच केरळचा आतील भाग आणि तामिळनाडू येथे कमीच पाऊस झालेला असून सरासरी पासून खूपच लांब आहे.
ताज्या अंदाजानुसार या भागात अजून काही दिवस तरी पावसाचा जोर कमीच असेल. यामुळे द्वीपकल्पाच्या भागात पावसाच्या तुटीत भरच पडेल.
या भागावर असलेली मान्सूनची लाट जास्त क्षमतेची नाही आणि वेगळी प्रणालीही तयार होताना दिसत नाही त्यामुळे अजून एक आठवडा तरी मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता नाही.
दरम्यानच्या काळात पश्चिम किनारपट्टी, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची किनारपट्टी या भागात वेगवेगळ्या निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे चांगला पाऊस होईल. स्कायमेट या संस्थेच्या अंदाजानुसार तेलंगणा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होतच राहील कारण बंगालच्या उपसागरात उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
तसेच पश्चिम किनारपट्टीजवळील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रापासून ते केरळ पर्यंत होत असल्याने कोकण, गोवा आणि कर्नाटकाची किनारपट्टी आणि केरळ येथे मान्सून सक्रीय आहे.
जूनचा शेवट किनारपट्टीच्या भागांसाठी सामान्य असला तरी आतल्या भागांसाठी मात्र कोरडाच होता.
Image Credit: livemint.com