मुंबईत पावसाने पुनरागमन केले असून २१ तासांच्या कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेत ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बदलापूर, कांदिवली आणि लगतच्या भागात गडगडासह जोरदार पावसाळी गतिविधी अनुभवण्यात आल्या.
स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी मुंबई शहरासाठी आगामी २४ ते ४८ तासांदरम्यान अजून पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान हा पाऊस दुपारनंतर, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी होण्याची शक्यता आहे.
पावसाळी गतिविधी अल्प कालावधीसाठी असून स्थानिक असतील. दोन दिवसानंतर मात्र वातावरण मोकळे आणि हळूहळू कोरडे होईल.
मान्सूननंतरच्या काळात, गडगडाटी गतिविधींची तीव्रता आणि वारंवारता वाढते आणि तीव्र पावसाळी गतिविधी (जरी थोड्या काळासाठीच) नियमित अनुभवल्या जातात. तसेच सखल भागात पाणी साचणे देखील सामान्य आहे.
मान्सून नंतरचा हंगाम सुरू झाल्यापासून मुंबईत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार शहरात आणखी पावसाची शक्यता आहे.
तथापि, हा पाऊस व्यापक नसेल ज्यामुळे कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवण्याची शक्यता नाही.
Image Credits – National Herald
Any information taken from here should be credited to Skymet Weather