कर्नाटकच्या किनारपट्टीकडील भागात गेल्या काही दिवसात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. मागील २४ तासात अगुंबे येथे २३४ मिमी पाऊस झाला आहे. याच्या जोडीला होनावर येथे ३७ मिमी तर मेंगलोर येथे ४१ मिमी आणि मेदिकरी येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या मान्सून कोकणापासून ते केरळ पर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीच्या भागात पुन्हा कार्यान्वित झाला आहे. याच्यामुळे येत्या २४ ते ४८ तासात कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता तर आहेच आणि याच्या जोडीला कर्नाटकातील आतील भागातील जिल्ह्यात देखील चांगला पाऊस अपेक्षित आहे.
आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार कर्नाटकच्या किनारपट्टीचा भागात पाउस सरासरीपेक्षा २६% कमी झाला आहे. उत्तर कर्नाटकात ३४% कमी पाऊस तर दक्षिण कर्नाटकात १% जास्त पाऊस झाला आहे. यामुळे आता होणाऱ्या पावसामुळे दक्षिण कर्नाटकातील पावसाचे प्रमाण थोडे वाढण्याची शक्यता आहे आणि किनारपट्टीच्या भागातील परिस्थितीत थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
जुलै मध्ये मान्सूनने घेतलेली मोठी विश्रांती आणि चांगल्या मान्सून प्रणालीची अनुपस्थिती हे पावसाच्या कमी असण्याचे मुख्य कारण आहे. तसेच सर्वसामान्य मान्सून काळात अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा पश्चिम किनारपट्टीला समांतर असा असतो तो या वर्षी खुप अशक्त होता.
पण आता तो कमी दाबाचा पट्टा आता कार्यान्वित झाला असून या भागावर चांगला पाऊस करवेल अशी अपेक्षा आहे. या मुळे वर सांगितल्याप्रमाणे कर्नाटकच्या किनारपट्टीचा भागात मुसळधार तर आतील भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.