१ जूनला येणारा नैऋत्य मान्सून अखेरीस ५ जूनला केरळात येऊन धडकला. मान्सूनच्या आगमनाला उशीर का झाला हे समजून घेणे गरजेचे आहे. केरळातील मान्सूनचे आगमन दरवर्षी एकाच तारखेला होतेच असे नाही. मान्सूनच्या आगमनाची वेळ आणि मान्सून काळात होणारा पाऊस याच्यात तसा काही संबध नसतो.
१ जून हि मान्सूनच्या केरळातील आगमनाची तारीख हि, मागील अनेक वर्षांच्या तारखा अभ्यासून त्यांच्या सरासरीवरून ठरवलेली आहे. यात बदल होणे स्वाभाविक आहे. आपण दरवर्षी १ जूनलाच मान्सूनचे आगमन होईल अशी अपेक्षा करू शकत नाही कारण त्याचे आगमन हे समुद्रात तयार होणाऱ्या मान्सून प्रणालींवर अवलंबून असते.
उदाहरण बघावयाचे झाल्यास गेल्या वर्षी (२०१४) मान्सून चे आगमन ६ जून ला झाले होते, तसेच २०१३ व २०१२ मान्सून चे आगमन अनुक्रमे १ जून आणि ५ जूनला झाले होते, तर २०११ मध्ये मान्सूनचे आगमन २९ जूनलाच झाले होते परंतु २००९ मध्ये मान्सून चे आगमन सरासरीच्या खूपच आधी म्हणजे २३ मे ला झाले होते. यावरून असे दिसून येते कि मान्सूनच्या आगमनाची तारीख दरवर्षी बदलत जाते.
साधारण अंदाज येण्यासाठी गेल्या काही वर्षात जून महिन्यात झालेल्या सरासरी पावसाची तुलना पुढीलप्रमाणे.
यावरून असे लक्षात येते कि मान्सूनच्या अगमांच्या तारखे वरून संपूर्ण मान्सून काळात होणाऱ्या पावसाचे प्रमाण ठरवत येत नाही. मान्सून मध्ये किती पाऊस होईल हे त्या काळात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालींची वारंवारता, तीव्रता, क्षमता आणि त्यांची भौगोलिक स्थिती यावर अवलंबून असते. थोडक्यात सांगावयाचे झाले तर मान्सून काळात कसा, कुठे आणि किती पाऊस पडेल याचा मान्सूनच्या आगमनाची तारखेशी फारसा संबध नसतो तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालींचा परिणाम मान्सूनवर होत असतो.
Image Credit: ibnlive.com