[Marathi] रब्बीची आवक सुरु झाल्यावर खरिपाच्या नुकसानीमुळे बाजारात निर्माण झालेले चिंतेचे वातावरण कमी होण्याची शक्यता, हा आठवडा ईशान्य मान्सून कमकुवत राहणार, पूर्व आणि ईशान्य भारतात हिवाळ्यातील पहिला पाऊस, उत्तर भारतात पाऱ्यात घट होवून तापमान एक अंकी होणार

December 9, 2019 3:51 PM|

onion price

यावर्षीच्या मुसळधार आणि लांबलेल्यामान्सूनच्या पावसामुळे खरीप पिकांची आवक घटली असूनत्यामुळे भाववाढ झाली आहे.

महाराष्ट्राच्या सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर २०० रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालून घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांवर साठवणुकीवर मर्यादा घालून केंद्र सरकारने संकटाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, या उपायांचा काहीच परिणाम झाला नाही असे दिसते. सध्याच्या किंमतीतील वाढीच्या तुलनेत मालाची कमतरता हे या दाखल्याचे प्रमाण आहे.

गेल्या आठवड्यात स्कायमेटने जाहीर केलेल्या खरीप अहवालात (खंड-३) म्हटल्याप्रमाणे या वर्षीचा मान्सून हा गेल्या २५ वर्षातील सर्वोत्कृष्ट मान्सून ठरला आहे. तथापि, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशाच्या दोन तृतीयांश भागात पावसाची कमतरता होती. नंतरच्या महिन्यात ही तूट केवळ पूर्णपणे भरून निघाली नाही तरी देशव्यापी सर्वसमावेशक पाऊस १० टक्के अतिरिक्त झाला. पावसाचे उशिरा आगमन आणि त्यानंतरची कमतरता, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या मुसळधार पावसाने कांद्याच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम केला. गतवर्षीच्या तुलनेत उशिरा आलेल्या पावसाने खरिपाच्या लागवडीमध्ये ७ टक्क्यांची घट नोंदवली तर अवकाळी पाऊस पडल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. तूर, मूग, उडीद, सोयाबीन, मका यासारख्या खरीप पिकांच्या किंमतीही या कारणाने वाढल्या आहेत.

कांद्याचे उत्पादन तीन हंगामात होते: खरीप (जुलै-ऑगस्टमध्ये लावणी आणि ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये कापणी), उशीरा-खरीप (ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि जानेवारी-मार्च) आणि रब्बी (डिसेंबर-जानेवारी आणि एप्रिल-मे). सन २०१८-१९ मध्ये भारताचे कांद्याचे अंदाजीत उत्पादन २३४.८५ लाख टन होते, त्यातील रब्बी पिकाचे ६५% पेक्षा जास्त योगदान होते, तर उर्वरित उशिराच्या खरीप (२०%) आणि खरीप (१%%) मधील होते. जास्त पाऊस पडल्याचा खरीप उत्पादनास फायदा झाला नसला, परंतु यामुळे जमिनीत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे रब्बी पिकास फायदा होईल. या पावसामुळे भूजल सारणी आणि जलवाहिन्यांचे पुरेसे पुनर्भरण झाले आहे, जे दीर्घ काळासाठी फायद्याचे आहे.

येत्या आठवड्यासाठी हवामानाचा अंदाज

उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागातील तापमान एक अंकी झाल्याने मागील आठवडा तसा शांत राहिला. ईशान्य मॉन्सून विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात सौम्य राहिला आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, पाचही उपविभागात आजवर सामान्य ते जास्त पाऊस पडला आहे.

हवामान विषयक गतिविधींच्या बाबतीत संपूर्ण उत्तर भारतामध्ये या आठवड्याला तशी शांत सुरूवात होईल आणि त्यानंतर बर्‍यापैकी व्यापक गतिविधी अनुभवल्या जातील. मैदानीभागात गडगडाटासह पाऊस आणि डोंगराळ भागात विशेषतः १२ आणि १४ रोजी हिमवृष्टी होईल. उत्तर भारतातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. येत्या १५ तारखेनंतर मैदानीभागात शीतलहरीची परिस्थिती अपेक्षित आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतामध्ये विशेषत: १३ आणि १४ डिसेंबरला हिवाळ्यातला पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ईशान्येकडील राज्यांमधील आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या राज्यांत पावसाचा परिणाम होईल.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल.

ईशान्य मान्सूनची दक्षिण भारतात कमकुवत उपस्थिती असेल. आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मर्यादित पावसाळी गतिविधी अपेक्षित आहे. साधारणपणे दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ येथे हा आठवडा पावसाच्या बाबतीत शांत असेल. चेन्नईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मॉन्सूनसाठी हा तुटीचा आठवडा ठरु शकेल.

Image Credits – The Economic Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

Similar Articles

thumbnail image
March 20, Today Marks The Spring Equinox: Day-Night Duration Nearly Equal

The official transition from winter to spring, known as the SPRING EQUINOX, occurs today! It’s time when the Sun crosses the celestial equator precisely at 2:31 PM, delivering warmer, longer days to the Northern HemiSphere. As autumn arrives, the South enjoys colder evenings.

posted on:
thumbnail image
आज सूर्य करेगा भूमध्य रेखा पार, बसंत ऋतु की शुरुआत, दिन-रात की अवधि लगभग बराबर

आज, 20 मार्च 2025, बसंत विषुव (Spring Equinox 2025) का दिन है। सूर्य भूमध्य रेखा को पार करेगा, दिन बड़े और गर्म होंगे। उत्तर गोलार्ध में बसंत ऋतु की शुरुआत होगी, दक्षिण गोलार्ध में शरद ऋतु का आगमन होगा। वहीं, सितंबर में यह खगोलीय घटना फिर से होगी।

posted on:
thumbnail image
गर्मी का दायरा बढ़ा! ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना और रायलसीमा में 40°C के पार तापमान, राहत की उम्मीद

देश में समय से पहले गर्मी असर बढ़ रहा है। ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश में अभी तापमान से 40°C से ऊपर पहुंच गया है, जिस कारण इन राज्यों में भीषण गर्मी हो रही है। फरवरी 2025, पिछले 125 वर्षों में सबसे गर्म महीना रहा है। कई जगहों पर सामान्य से 6.4°C तक ज्यादा तापमान रिकॉर्ड हुआ है।

posted on:
thumbnail image
दिल्ली में बढ़ेगी गर्मी! शुष्क और तपता रहेगा वीकेंड, बारिश की संभावना हुई कम

दिल्ली में गर्मी बढ़ रही है, पिछले 3 दिनों में तापमान 4°C बढ़ा है। आज अधिकतम 34-35°C, न्यूनतम 17°C तक रह सकता है। मार्च अब तक लगभग शुष्क बना हुआ है, सिर्फ 2mm बारिश दर्ज हुई है। 26-28 मार्च को तापमान 40°C के करीब पहुंचने की संभावना है। वहीं,पश्चिमी विक्षोभ से मैदानी इलाकों में बारिश की संभावना नहीं है।

posted on: