हवामानाच्या दृष्टिने कर्नाटक तीन भागात विभाजित होतो एक म्हणजे कर्नाटक किनारपट्टी , दुसरा दक्षिण कर्नाटकातील भाग आणि उत्तर कर्नाटकातील भाग. या तिन्हीपैकी किनारपट्टीच्याच्या भागात सर्वात जास्त पाऊस होतोनी त्यापाठोपाठ दक्षिण कर्नाटक आणि मग नंतर उत्तर कर्नाटकातील भाग असा पावसाचा क्रम असतो.
उत्तर कर्नाटकातील बराच भाग पश्चिमी घाटांच्या डोंगराच्या आडोश्याला असल्याने तेथे कमी प्रमाणात पाऊस होतो. तसेच दक्षिण कर्नाटकातील भाग हा एक छोटासा भाग असल्याने आणि तो सखल भाग असल्याने या भागात चांगला पाऊस होतो.
जर मान्सूनच्या पावसाचा विचार केला तर १ जून ते १० ऑगस्ट पर्यंत कर्नाटक राज्यात पावसाचा तुटवडा आहे.उत्तर कर्नाटकातील भाग हा सर्वात जास्त कोरडा असून तेथे सरासरीपेक्षा ४५% कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण देशभरातील विभागांच्या नोंदींचा आढावा घेतल्यास मराठवाड्यानंतर उत्तर कर्नाटकाचा नंबर लागतो.
तसेच सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात उत्तर कर्नाटकातील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. आतापर्यंत गुलबर्गा येथे ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आणि गदग येथे हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे २ मिमी पावसाची नोंद झाली.
स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या मॉडेल्सनुसार या भागातील पाऊस १३ ऑगस्ट पासून जोर धरेल. तसेच यादरम्यान बऱ्याच भागात चांगला पाऊस होईल.
याच दरम्यान सोमवारी पश्चिम कर्नाटकातही चांगलाच पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात होनावर येथे ७८ मिमी पाऊस झाला तसेच कारवार आणि मंगरूळ येथे अनुक्रमे ५५ मिमी आणि २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Image Credit: deccanchronicle.com