[Marathi] महाराष्ट्रवासीयांची उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही

October 15, 2018 6:28 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील हवामानाच्या परिस्थितीत आतापर्यंत एक महिन्यांत कोणताही बदल झालेला नसून राज्यातील हवामान कोरडे व उबदार राहिले आहे. तसेच नागरिकांची तूर्तास तरी उकाड्यापासून सुटका अपेक्षित नाही.

उत्तर पूर्व दिशेने चाललेल्या येनारा कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील बहुतांश भाग उबदार राहतील. राज्यातील बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सामन्यपेक्षा 2-3 अंशांनी अधिक आहे. दरम्यान, किमान तापमान सामान्यपेक्षा कमी असल्यामुळे रात्री वातावरणात थंडावा आलेला आहे.

पुढील २-३ दिवस राज्यावर कुठलीही हवामान विषयक गतीविधी अपेक्षित नसून, १८ ऑक्टोबर रोजी मात्र कोकण आणि गोव्यावर एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असून त्यामुळे दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याउलट, उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान उष्ण असेल. तसेच मुंबईत देखील पुढील ३-४ दिवस हवामान उष्ण व दमट राहणार असे दिसत आहे.

Image Credits – Nations Online Project

ny information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES