[Marathi] बंगालच्या उपसागरात हंगामातील सहावे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मध्य भारतात पुन्हा पाऊस हजेरी लावणार

August 29, 2019 3:12 PM | Skymet Weather Team

भाकीत केल्यानुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशाच्या भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

यावर्षात ऑगस्टमध्ये सलग सहाव्या क्रमांकाचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे, मान्सूनचा पाऊस मध्य भारतावर पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होईल अशी अपेक्षा आहे.

हवामानतज्ञांच्या मते, हि प्रणाली देखील आधीच्या प्रणाली प्रमाणेच मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ दिवसांत हि प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने मध्य भारतातून आगेकूच करेल. तथापि, ही मान्सून प्रणाली फारशी मजबूत नाही. त्यामुळे, जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही.

मागील प्रणालीच्या तुलनेत, बर्‍याच भागांवर पावसाची तीव्रता मध्यम असेल आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये आधीच कमी अधिक प्रमाणात पावसाची नोंद सुरू झाली आहे. आजही दोन्ही राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहील. हळूहळू, प्रणालीच्या प्रभावामुळे परिघातील छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात देखील पावसाला सुरुवात झाली आहे.

ही प्रणाली जसजशी पुढे जाईल तसतशी पश्चिम मध्य प्रदेशातही पाऊस हजेरी लावेल. ही यंत्रणा राजस्थानापर्यंत जाण्याची अपेक्षा असून त्यामुळे पूर्व राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्येही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

तथापि, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या काही भागांतही पावसाची शक्यता असून पाऊस वर उल्लेखलेल्या ठिकाणांच्या तुलनेत कमी असेल. कमी दाबाच्या क्षेत्राच्या हालचालींच्या प्रभावामुळे दिल्ली एनसीआर मध्येही ३० ऑगस्टच्या सुमारास चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

Image Credits – Hindustan Times 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES