[Marathi] महाराष्ट्रातील सुमारे १०,५०६ खेड्यात आणि ४,९२० गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती

May 30, 2019 8:28 PM | Skymet Weather Team

राज्यातील अनेक भाग सध्या दुष्काळग्रस्त स्थितीत आहेत. राज्यात आतापर्यंत पावसाची कमतरता राहिली असून, महत्त्वपूर्ण हवामान विषयक गतिविधींच्या अभावामुळे या परिस्थितीत कोणतीही सुधारणा अपेक्षित नाही.

मराठवाड्यात पाण्याची सर्वात बिकट परिस्थिती आहे. सर्वात मोठा जलसाठा असलेले जायकवाडी धरण कोरडे झाले आहे. खरं तर, मराठवाड्यातील जलाशयांमध्ये फक्त २.८६% पाणीसाठा शिल्लक आहे.

सध्या असलेल्या परिस्थितीकडे पाहून, आपण असे म्हणू शकतो की आगामी काळात राज्यातील पाण्याचे संकट आणखी तीव्र होईल. आकडेवारीनुसार सध्या महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये जवळपास १०,५०६ खेडे आणि ४९२० गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष आहे. शिवाय, तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचे सर्व उच्चांक मोडीत निघत आहेत.

मराठवाडा हा सर्वाधिक दुष्काळग्रस्त भाग आहे, येथील नऊ पैकी नऊ जलाशयांमध्ये पाणी नाही. मान्सूनच्या विलंब लक्षात घेता विशेषकर औरंगाबाद विभागामध्ये पाण्याची मागणी वाढत आहे.

Also read in English: Nearly 10,506 townlets and 4,920 villages in Maharashtra on drought alert

उष्णतेची लाट, पाण्याच्या पातळीचा घटलेला स्तर आणि मान्सूनचे उशीरा आगमन ह्या सर्व घटकांमुळे पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. या परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी, दुष्काळग्रस्त भागांत पाणी पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक ६२०९ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागात देखील मागील वर्षीच्या ६७ टँकरच्या तुलनेत यावर्षी १०१६ टँकर पाणी पुरवठा करत आहेत. 'नाशिक, पुणे आणि मराठवाडा ही सर्वाधिक प्रभावित भागात आहेत', असे ग्रामीण पाणी व स्वच्छता विभागाचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये ३५८ पैकी सुमारे १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.

सध्याच्या परिस्थितीकडे पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडून दुष्काळग्रस्तांसाठी काम सुरू करण्यास परवानगी घेतली आहे. याआधी त्यांनी २०१९ पर्यंत राज्य टँकर-मुक्त करू असे सांगितले होते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES