[Marathi] नाशिकात मध्यम ते जोरदार पाऊस, पुण्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, पावसाची शक्यता

October 6, 2019 1:35 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील बर्‍याच भागांत गेल्या २४ तासांत विखुरलेला पाऊस पडला आहे. प्रामुख्याने नाशिक शहरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या असून चोवीस तासांच्या कालावधीत ३४ मिमी पावसाची नोंद झाली तर अकोला, औरंगाबाद आणि मुंबई येथे हलक्या सरी नोंदल्या गेल्या.

पुण्यातील वेधशाळेत ३ मिमी पावसाची नोंद झाली असून शहर व आसपासच्या परिसरात गडगडाटांसह पावसाळी गतिविधी अनुभवण्यात आल्या.

दुसरीकडे, विदर्भात मात्र हवामान विषयक गतिविधी तुलनेने कमी राहिल्या व केवळ विखुरलेला पाऊस नोंदला गेला. दरम्यान, मुंबई व उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली, तथापि, सांताक्रूझ वेधशाळेमध्ये गेल्या चोवीस तासांत तुरळक पावसाची नोंद झाली.

हवामान प्रणालींविषयी सांगायचे तर, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या उत्तर अंतर्गत कर्नाटकावर वातावरणात खालच्या थरात चक्रवाती अभिसरण विकसित झाले आहे. या प्रणालीमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाळी गतिविधींमध्ये वाढ झाली आहे. हि प्रणाली वायव्य दिशेने मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्याच्या दिशेने जाईल. म्हणूनच मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोव्याच्या बर्‍याच भागांत आणखी दोन ते तीन दिवस पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

या कालावधीत मुंबईत एक किंवा दोन मध्यम सरींसह तुरळक पावसाची नोंद होवू शकते. दरम्यान, पुणे आणि आसपासच्या भागात तीव्र हवामान विषयक गतिविधींची शक्यता आहे.

याकाळात विदर्भात मात्र विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credits – Maharashtra today

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES