स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भावर हलका ते मध्यम पाऊस पडला तर मराठवाड्यात काही चांगल्या सरींची नोंद करण्यात आली. दरम्यान, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर यासारख्या ठिकाणी पाऊस पडला आहे.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपासून स्कायमेटकडे उपलब्ध २४ तासांच्या आकडेवारीनुसारहर्णै येथे ९१ मिमी, त्यानंतर सांताक्रूझ (मुंबई) ६९ मिमी, सोलापूर ५९ मिमी, रत्नागिरी ५८ मिमी, ठाणे ५५ मिमी, माथेरान ३८ मिमी पाऊस पडला आहे. बीड मध्ये ३० मिमी आणि पुणे २६ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये केवळ ३ मिमी पाऊस पडला आहे.
सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रवाती परिस्थिती आहे. ही व्यवस्था पश्चिम दिशेने सरकते आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे आणखी २४ ते ४८ तास मध्यम पाऊस पडेल. एक दोन जोरदार सरींची देखील शक्यता आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, अहमदनगर यासारख्या ठिकाणी मध्यम सरी बरसतील, तर ठाणे, डहाणू,मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गआणि महाबळेश्वर येथे आणखी दोन दिवस मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याच काळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामान विभागांमध्ये विखुरलेला पाऊस पडेल. तथापि, २४ तासांनंतर तीव्रता कमी होण्यास सुरवात होईल.
२२ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यातील पावसाळी गतविधींमध्ये लक्षणीय घट होईल आणि त्यानंतर कोकण आणि गोव्याच्या काही भागांत केवळ विखुरलेला पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्याचे हवामान मुख्यतः कोरडे राहील.
Image Credits – Maharashtra today
Any information taken from here should be credited to Skymet Weather