[Marathi] आज नागपुरात भारत विरुद्ध बांगलादेश, तिसऱ्या टी-२० दरम्यान हवामान कसे असेल ते जाणून घ्या

November 10, 2019 1:17 PM | Skymet Weather Team

रविवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी -२० सामना होणार आहे. हवामान कसे असेल ते पाहूया.

गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर व आजूबाजूच्या भागात कोरडे हवामान होते. हे हवामान अंशतः ढगाळ आकाश परिस्थितीसह होते.

स्कायमेट वेदरनुसार शहरभर कोणतीही महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली उपस्थिती नसल्याने आज दिवसभर कोरड्या हवामानाची स्थिती कायम राहील. दिवसाचे तापमान ३१ आणि ३२ डिग्री सेल्सिअस दरम्यान व किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील.

साधारण १९:०० वाजता, दिवसाचे तापमान २४ डिग्री सेल्सिअस इतके असेल, जे खाली घसरेल आणि २३:०० तासांपर्यंत ते २३ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास जाईल.

सायंकाळी साडेसात वाजता आर्द्रतेचे प्रमाण सुमारे ७५% राहील, जे हळूहळू वाढेल आणि सुमारे २२:०० तास भारतीय प्रमाण वेळ च्या दरम्यान ते ८४% ते ८८% पर्यंत राहील. सर्वात कमी सापेक्ष आर्द्रता १४:३० तास भारतीय प्रमाण वेळ दरम्यान सुमारे ४०% ते ४५% दरम्यान असेल.

Image Credits – Firstpost 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES