महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासात, महाराष्ट्र, विशेषत: विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची अतिशय तीव्र स्थिती अनुभवण्यात आली.
दिवसाचे कमाल तापमान किंचित प्रमाणात कमी होत असले तरी ते सतत ४३ ते ४४ अंश एवढे नोंदविले जात आहे. अशा प्रकारे, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील खूप भागांत उष्ण लाटेची परिस्थिती आहे.
दुसरीकडे, कोकणच्या हवामानामध्ये कोणताही बदल होताना दिसत नसुन तेथील हवामान कोरडे व उबदार असुन कमाल तापमान ३३ ते ३५ अंश एवढे नोंद होत आहे .यानंतर देखील, कोकण आणि मध्य महाराष्ट्र येथील हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे.
स्काय मेट वेदरच्या हवामान अंदाजानुसार उष्ण तापमानापासुन थोडीशी सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे. विदर्भाच्या दक्षिणेला एक चक्रीवादळ व कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे वारे आता कर्नाटक किनारपट्टीकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे,विदर्भातील व मराठवड्यातील काही भागात आज गडगडाटी वादळासह हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
अकोला, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तथापि, कोकण प्रदेश संपूर्ण उबदार आणि कोरडा राहील, हा पुर्व मौसमी पाऊस २४ तासापर्यंत राहु शकतो ,त्यानंतर पुन्हा एकदा कमाल तापमानामध्ये वाढ होऊन हवामान उष्ण होईल.
हवामानाचा महाराष्ट्र कृषवर होणारा परीणाम पाहू;
विदर्भामध्ये चक्रीवादळामुळे आंबा ,संत्रा ,मोसंबी ह्या फळांची गळती होऊ शकते म्हणुन शेतकरी बंधुनी लवकरात लवकर फळे काढुन घ्यावीत . शेतकरी बंधुनी वाढते तापमान लक्षात घेऊन मका, भुईमूग, भात या पिकांना पानी द्यावे . कोकण मधील शेतक-यांनी भात पीक काढणी सुरू ठेवावी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात भुईमूग पीक कापणी सुरु करावी.
Image Credit: celebritypix.us
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.