गणेश चतुर्थीची मुंबई शहरात नेहमीप्रमाणे पाऊस पडण्यास सुरुवात झाली. बऱ्याच काळापासून मुंबईतील हवामान मुख्यतः कोरडे होते व केवळ हलक्या पावसाची नोंद करण्यात येत होती.
मात्र, रात्रीनंतर पावसाने वाढ केल्याने कालपासून पावसाळी गतिविधी कायम आहे. काल पहाटे साडेपाच वाजल्यापासून गेल्या २१ तासांत मुंबईतील सांताक्रूझमध्ये १०६ मिमी पावसाची नोंद झाली.
इतका की, या तीन अंकी पाऊसानंतर शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले आहे, ज्यात पार्क केलेली वाहनेही अर्धवट पाण्यात बुडाली आहेत.
सकाळी ६ वाजताही पाऊस सुरूच होता. स्कायमेटने यापूर्वीच शहरात ३ सप्टेंबरपासून पावसाच्या कामात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला होता.
सध्या, मॉन्सूनची ट्रफ रेषा कर्नाटकच्या किनारी भागांवर आणि केरळच्या काही भागांत सक्रिय आहे. आता ही प्रणाली उत्तरेकडे गेली आहे. शिवाय, दक्षिण गुजरात मध्ये चक्रवाती परिस्थिती अजूनही कायम आहे. ओडिशा आणि त्याच्या आसपासच्या भागांत कमी दाबाचा क्षेत्र उपस्थित आहे. परिणामस्वरूप संपूर्ण कोकण आणि गोवा तसेच मुंबई व उपनगरामध्ये पाऊस सुरु आहे.
अशाप्रकारे, आम्ही मुंबई आणि उपनगराच्या काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही जोरदार सरींची अपेक्षा करतो. या पावसामुळे पाणी साचेल आणि वाहतुकीची कोंडी होईल. कमीतकमी पुढच्या ४८ तासांसाठी हा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
कोरड्या व दमट हवामानाच्या दीर्घकाळानंतर शहरात पाऊस पडत असल्याने या पावसाने दिलासा मिळाला आहे. तापमानात घट दिसून आलेली आहे व हवामान सुखद राहील.
Image Credits – Tripsavy
Any information taken from here should be credited to Skymet Weather