मागील काही दिवसांपासून, मुंबईत आरामदायक दिवस अनुभवण्यात येत आहे. तथापि या दरम्यान, एक दोन दिवस हवामान अतिशय गरम पण राहिले. १६ मार्चला कमाल तापमान ३६.६ अंश नोंदवले गेले. त्यानंतर, उत्तर पश्चिम दिशेने थंड वारे वाहू लागले ज्यामुळे किमान आणि कमाल तापमान समान्यपेक्षा कमी राहिले आणि स्थिती आरामदायक झाली .
२० मार्चला, शहरात कमाल तापमान ३१.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा १ अंश कमी होते, आणि गेल्या २४ तासात, कमाल तापमान ३०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे समान्यपेक्षा २ अंश कमी आहे.
दुसरीकडे किमान तापमान १८.४ अंश नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ४ अंश कमी आहे.
परंतु आता येणाऱ्या आठवड्यात हवामानाची परिस्थिती बदलेल आणि मुंबईकर गरम आणि उबदार वारे अनुभवतील, ज्यामुळे मुंबईकरांना त्रास होणे अपेक्षित आहे.
स्काईमेटच्या अंदाजानुसार, दक्षिण पाकिस्तानवर एक चक्रीवादळ विकसित होईल, ज्यामुळे गरम वारा राजस्थान आणि गुजरातपासून उत्तर कोकण भागांवर वाहील. या वाऱ्यांमुळे दिवसाचे तापमान वाढतील.
आमचा अंदाज आहे की पुढील तीन दिवसात तापमानात लक्षणीय वाढ दिसून येईल. तथापि, 24-26 मार्च दरम्यान, मुंबईतील तापमान एकदम वाढेल आणि पारा ३८-३९ अंश सेल्सिअसपर्यन्त पोहोचेल.
खरं तर, उष्ण हवामान असून, संपूर्ण शहरातील परिस्थिती त्रासदायक होईल.
मार्च महिन्यात मुंबईमध्ये पाऊस पडत नाही. एप्रिल महिन्यात पण हि स्थिती अशीच कायम राहते. मे महिन्यापासून प्री-मॉन्सूनमुळे पावसाची सुरुवात होते, आणि जून महिन्यापासून मॉन्सूनची सुरुवात होते व चांगला पाऊस नोंदवण्यात येतो.
Image Credits – Wikipedia
Any information taken from here should be credited to Skymet Weather