[Marathi] मुंबईतपावसाचेपुनरागमन, पुढीलआठवडापावसाचा

May 23, 2016 3:48 PM | Skymet Weather Team

५ मार्च पासून मुंबईत खूप उकाडा सुरु आहे. त्याच दिवशी मुंबईत १० मिमी पावसाची नोंद झाली होती त्यानंतर मात्र पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली होती.
स्कायमेटच्या सूत्रांनुसार रविवारी रात्री मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हा पाऊस तुरळक आणि अगदी काही मिनिटेच झाला आहे. आताची परिस्थिती पाहता मुंबईत आगमनासाठी पाऊस सज्ज झाला आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेच्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात बऱ्याच भागात पावसाच्या सरी झाल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

येत्या २४ तासात मुंबईत चांगल्याच पावसाची शक्यता आहे. तसेच २५ मेच्या आसपास पावसाची तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे. ३१ मे पर्यंत मुंबईच्या बहुतेक भागात अशीच पावसाची उघडझाप सुरूच राहील. यामुळे पाऊस सुरु झाल्यावर मुंबईकरांची हैराण करणाऱ्या हवामानापासून सुटका नक्कीच होईल.

रबी समुद्रातील उत्तर व मध्य भागात तयार झालेल्या चक्रवाती अभिसरणामुळे हा पाऊस होत असून या अभिसरणामुळे तसेच नैऋत्येकडून येणारे वारे यामुळे अरबी समुद्रात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. तसेच पश्चिम किनारपट्टीला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्याने मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
तसेच सतत होणाऱ्या तुरळक पावसाच्या सरींनी मुंबई शहराला दिलासा मिळेल आणि तापमानही काही अंशी कमी होईल. होणारा पाऊस हा तुरळक स्वरूपाचा असल्याने व्यापक नसेल. परंतु मान्सून येण्याआधीच मुंबईकर मात्र पावसाचा आनंद घेऊ शकतील.

Image Credit:amman-phase.blogspot.com

 

OTHER LATEST STORIES