मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस तसा फारसा झाला नाही पण जून महिन्याची सुरुवात होताच यात मात्र कमालीची वाढ होताना दिसून आली आहे. याला कारण म्हणजे मुंबईत नेहमीच मान्सूनचे आगमन १० जूनच्या आसपास होत असते जे यंदा ४ ते ५ दिवसांनी लांबणीवर गेले आहे आणि त्यामुळेच आता मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढेल. नेहमी जेव्हा मान्सूनचे आगमन अगदी उंबरठ्यावर येऊन पोहचलेले असते तेव्हा मुंबई शहरात मान्सूनपूर्व पावसाला जोमाने सुरुवात होते.
हे सर्व लक्षात घेता सध्याचे वातावरण मान्सूनपूर्व पावसासाठी अगदीच पूरक असल्यने येत्या २४ ते ४८ तासात चांगल्याच पावसाची अपेक्षा आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात केरळच्या किनारपट्टीजवळ जे चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झाले होते ते आता किनापट्टीपासून थोडे लांब सरकले आहे.
आणि या प्रणालीचा परिणाम म्हणजे मुंबई आणि किनारपट्टीवरील भाग, कर्नाटक आणि कोकण व गोवा येथे येत्या २४ तासात पावसाच्या स्वरुपात होईल.
या प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात होईल कि नाही याबाबत मात्र जरा शंका आहे कारण उत्तर अरबी समुद्राचे पाणी तसे थंड असल्याने ते चक्रीवादळासाठी अनुकूल नाही. जर या चक्रवाती प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात झाले तर त्याचा विपरीत परिणाम पश्चिम किनारपट्टी आणि द्वीपकल्पाच्या भागावर होईल.
जर ह्या प्रणालीचे रुपांतर चाक्रीवादाळात झाले तर त्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी होईल आणि हे तापमान पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.
यादरम्यान या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुणे आणि रत्नागिरी येथे गेल्या २४ तासात चांगल्याच पावसाची नोंद झाली.
Image Credit: Indiatoday