[Marathi] मुंबईत कोरडे हवामान, येणाऱ्या ५ महिन्यात पाऊसाची अपेक्षा नाही

November 16, 2018 5:52 PM | Skymet Weather Team

देशातील दक्षिण भागांसाठी नोव्हेंबर महिना चांगल्या पाऊसाचा महिना मानला जातो,  जेथे पाऊसामुळे  हिरव्यागार वातावरण निर्माण होते आणि ताजे वारे वाहते.

दरम्यान उत्तरेकडील भागांसाठी नोव्हेंबर हा सर्वात आरामदायक महिना असतो जेथे सूर्याच्या प्रकाश   आनंददायी हवामान आणतो.  काही काळ  पाऊस पडतो, अन्यथा हवामान सामान्य राहते.

महाराष्ट्रा राज्य देशाच्या पश्चिम आणि मध्यम भागात स्थित असल्यामुळे, बहुतांश कोरडेच हवामान अनुभवले जाते.

स्वप्नाचे शहर आणि महाराष्ट्राची  राजधानी मुंबई अरबी समुद्र लगतच्या किनारपट्टी वर  स्थित आहे. एक तटीय शहर असल्यामुळे, संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात मुंबईत आद्रता अनुभवण्यात येते. तसेच  तापमान ३० अंशाचा जवळपास राहते आणि आद्रतेमुळे काही वेळेस अस्वस्थता निर्माण होते.

सध्या, मुंबईत कोरडेच हवामान असून,  कमाल तापमान ३२  अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० अंश सेल्सिअसपर्येंत पोहोचले आहे.

डिसेंबर महिन्याच्या आसपास  हवामानाची हि स्थिती बदलेल ज्यामुळे किमान तापमान २० अंशाचा खाली उतरेल आणि सकाळ, संध्याकाळ व रात्रीच्या वातावरणात थंडावा अनुभवला जाईल.

सध्या हवामानाची परिस्थिती पाहता, पुढील वर्षाच्या मे महिनापर्येंत पाऊसाची कोणतीही अपेक्षा दिसत नाही आहे.

Image Credits –Mumbai Tourism

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES