[Marathi] मुंबई पाऊस: चार दिवसात ७९५ मिमी पावसामुळे मुंबईचे कंबरडे मोडले, अर्धी मुंबई पाण्यात

July 2, 2019 6:13 PM | Skymet Weather Team

मुंबईत पावसाने थैमान मांडले असून गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहरात प्रचंड पाऊस झाला आहे. पावसाची सुरुवात निराशाजनक झाली परंतु जून महिन्याचा शेवट पावसाच्या आधिक्याचा राहिला. तर, जुलै महिन्याची सुरुवात पहिल्या दिवसापासून जोरदार पावसाने झाली. खरं तर, जुलैच्या पहिल्या दोन दिवसात, मुंबईने आपल्या मासिक सरासरी ८४०. ७ मिमी पावसाच्या तुलनेत ४६७ मिमी पावसाची नोंद केली आहे, जो जुलै महिन्याच्या सरासरीच्या अर्ध्याहून अधिक आहे.

शुक्रवारपासून जोरदार पाऊस पडत असून पावसाच्या तीव्रतेत देखील वाढ झाली आहे, शहरात शुक्रवारी तब्बल २३५ मिमी इतक्या जोरदार पावसाची नोंद झाल्यानंतर शनिवारी ९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी ९२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर, सोमवारी पहाटे ३७५ मिमी इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली.

अशा प्रकारे, मागील चार दिवसांत, शहरामध्ये ७९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवळजवळ संपूर्ण शहर पाण्यामध्ये गेल्याने मुंबईकरांना विश्रांती मिळाली आहे. अर्धी मुंबई जवळपास पाण्याखाली गेली आहे आणि पाऊस थांबण्याची चिन्हे अजून दिसत नाहीत.
मान्सूनच्या दिर्घ प्रतीक्षेनंतर त्याचे आगमन जोरदार झाले परंतु आता मात्र पावसाने कहर केला आहे. काल रात्रीच्या प्रचंड पावसामुळे ६० जण जखमी झाले असून काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत, सरकारी कार्यालयांसाठी सुट्टी जाहीर केली गेली आहे आणि बहुतेक खाजगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे.

आताही मुंबई मध्ये पाऊस पडणार असून परिस्थिती बिघडण्याची चिन्हे आहेत. सकाळी ११.५३ वाजता समुद्राची भरती अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES