Skymet weather

[Marathi] मुंबईकरीता यावर्षीचा मान्सूनचा हंगाम सर्वाधिक पावसाचा

September 30, 2019 3:48 PM |

Weather in maharashtra today

या हंगामात मुंबई शहरात चांगला पाऊस झाला असून या मौसमात शहरात ६२.४ टक्के पावसाचे आधिक्य आहे. नैऋत्य मान्सूनने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली असून शहरात पावसाने जून, जुलै आणि सप्टेंबरच्या सरासरीला सहज पार केले, तर ऑगस्ट बरोबरीत राहिला आहे.

तीस सप्टेंबर पर्यंत शहरात सामान्य २२६०.४ मिमी (१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत) च्या तुलनेत ३६७२.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

शहरात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान जवळपास १० वेळेस तीन अंकी पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी चार वेळा २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामध्ये २ जुलै रोजी मुंबईत ३७५.२ मिमी इतका मुसळधार पाऊस पडला.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, मुंबई शहरासाठी एकाच पावसाळी हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद यावर्षी झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसासाठी हवामानातज्ञांनी ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलास जबाबदार धरले आहे.

'केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण जगच या घटनांमुळे होरपळत आहे', असे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले.

संपूर्ण पावसाळी हंगामात मुंबईत काही मुसळधार पावसाळी गतिविधी पहायला मिळतात. तथापि, या हंगामात, शहरात मुसळधार पाऊस पडण्याच्या घटना बर्‍याचदा घडल्या आहेत. या मालिकेतील पहिली घटना २९ जून रोजी पहाण्यात आली जी २ जुलैपर्यंत चालली. दुसरी अतिवृष्टीची नोंद ९ जुलै रोजी आणि तिसरी २७ जुलै रोजी अनुभवली गेली. चौथ्या वेळेस ऑगस्ट महिन्यात ३ ते ५ दरम्यान मुसळधार पाऊस अनुभवण्यात आला.

तसेच ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान शहरामध्ये पाचवा अतिवृष्टीचा कार्यकाळ अनुभवण्यास मिळाला, तर सहावा भाग आठ सप्टेंबरला नोंदला गेला.

यासह, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की मान्सूनचा हा हंगाम असामान्य राहिला आहे कारण शहरात चारही महिन्यांत मुसळधार पाऊस नोंदला गेला. पावसाने मुंबई घातलेला धुमाकूळ विसरु नये !

Image Credits – National Herald

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try