मुंबईचा पाऊस हलका झाला आहे आणि गेल्या २१ तासात सांताक्रूझ वेधशाळेमध्ये फक्त ५ मिमी पावसाची नोंद झाली. तथापि, शहराच्या उपनगरांमध्ये काही मध्यम सरींची नोंद झाली आहे.
आमच्या वेदरमेनच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहर आणि आसपासच्या भागांत हलक्या पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार आणि पावसाच्या तीव्रतेत फार काही वाढ होण्याची शक्यता नाही आहे.
त्यानंतर २० सप्टेंबरच्या सुमारास तीव्रता वाढेल आणि एक-दोन तीव्र सरींसह मध्यम पाऊस पडेल. तथापि, पाऊस मुसळधार नसल्यामुळे तीव्र पाण्याचा साठा होईल, अशी शक्यता नाही आहे.
त्यानंतरही, हलका पाऊस सुरु राहिल आणि हवामान पूर्णपणे कोरडे होण्याची शक्यता नाही.
गेल्या काही दिवसांत, मुंबई येथे मुसळधार पाऊस पडला नाही आहे. केवळ १४ सेप्टेंबरला ४१ मिलीमीटरसह जोरदार सरींची नोंद करण्यात आली होती. परंतु, ह्या पावसामुळे फारसा त्रास झाला नाही. येणाऱ्या दिवसांत शहरात आणखी पावसाची शक्यता आहे.
शिवाय, या वेळी मान्सून उशिरा आला असल्याने त्याची परतीची वेळही वाढविण्यात आली आहे. खरं तर, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.
Image Credits – DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather