[Marathi] मुंबईत पावसाचा जोर कमी होणार, जोरदार सरींची शक्यता नाही 

July 12, 2019 7:05 PM | Skymet Weather Team


गेल्या २४ तासांपासून, मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडा कमी झाला असून बऱ्याच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला आहे. तथापि, काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत गुरुवार सकाळी ८:३० पासून कुलाबामध्ये ५८ मिमी तर सांताक्रूझमध्ये २५ मिमी पावसाची नोंद झाली.  काल दिवसभर पावसाळी गतिविधी चालू असून काही वेळेस जोरदार सरी देखील पडल्या तर काही काळ फक्त ढगाळ वातावरण होते.

दक्षिण गुजरात आणि आसपासच्या उत्तर महाराष्ट्रात असलेले चक्रवाती परिभ्रमण आता दुर्बल होईल. याशिवाय, महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते केरळ पर्यंत विस्तारलेली ट्रफ रेषा कमकुवत झाली असून कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीजवळ अजून दुर्बल होणार आहे.

ज्यामुळे आजपासून मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य-महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागात देखील पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होईल. तथापि, दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

सध्या मुंबई मध्ये एक आठवडाभर तरी जोरदार पावसाची शक्यता नाही. तथापि, एक ते दोन जोरदार सरींसह हलक्या पावसाची शक्यता असून जनजीवनात व्यत्यय येणार नसून तापमान वाढणार नाही मात्र आर्द्रतेमुळे वातावरण अस्वस्थ राहील.

Image Credits – The weather channel 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES