Skymet weather

[Marathi] पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमीच राहणार

August 15, 2019 10:08 AM |

rain in Mumbai

गेल्या २४ तासांत मुंबई शहरात हलका पाऊस झाला. खरं तर, बर्‍याच दिवसांपासून मुंबईत हलका पाऊस पडत आहे. आता शहरभरात पावसाच्या गतिविधींमध्ये जास्त वाढ अपेक्षित नाही आहे. आजही एक किंवा दोन तुरळक सरींची शक्यता आहे. उद्यापासून पुन्हा एकदा हवामान कोरडे होईल.

राज्याच्या इतर भागाविषयी बोलायचं तर, आता महाराष्ट्रातील अंतर्गत भागात, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या गतिविधींमध्ये घट झाली आहे. सध्या उत्तर पूर्व मध्य प्रदेश मध्ये कमी दाबाचा क्षेत्र आहे आणि तो उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जाईल. म्हणूनच, महाराष्ट्रात पावसाच्या गतिविधींमध्ये जास्त वाढ अपेक्षित नाही.

पुढील तीन ते चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हवामान जवळजवळ कोरडे राहील. तथापि, उत्तर-महाराष्ट्र कोकण आणि गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात एक-दोन मध्यम स्वरूपाच्या सरींची नाकारता येत नाही. एक-दोन मुसळधार सरींसह दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये मध्यम पाऊस पडेल.

तर, संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हवामानात फारसा बदल होणार नाही.

Image Credits – India Today

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try