मुंबईत पावसाचा लपंडाव सुरु होता व चक्रीवादळ वायू च्या प्रभावामुळे परत पावसाचे आगमन झाले होते. तथापि, चक्रीवादळ वायु निघून गेले आणि मुंबईत देखील पावसाचा जोर कमी झाला. मुंबईतील पावसाचे प्रमाण गेल्या २४ तासांत खूप कमी झाले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही जर मुंबईत आहात आणि आपल्या खिडकीतून पाहिले तर बाहेर सूर्य तळपत असल्याचे दिसत आहे.
तथापि, बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे, मुंबईत आठवड्याच्या शेवटी पाऊस होईल. शिवाय, आता ही यंत्रणा जमिनीकडे अंतर्गत भागात स्थलांतरित होईल आणि पश्चिम किनाऱ्यावर देखील एक ट्रफ विस्तारेल.
दरम्यान शनिवार-रविवारी पाऊस पडेल, त्यातही २३ जूनला चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, सुमारे २६ जून पासून पावसाचा जोर वाढलेला दिसून येईल आणि त्यानंतर काही दिवस सुरू राहील.
मुंबईतील मान्सूनच्या परिस्थितीबद्दल बोलायचे तर आता ११ दिवस उशीर झाला आहे आणि कमीतकमी या आठवड्याच्या शेवटपर्यंत सुरूवात होणार नाही. अशा प्रकारे, मुंबईत पुढील आठवड्यात पावसात वाढ दिसून येईल ज्यामध्ये काही काळ जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मुंबईत पुढील आठवड्यात मान्सूनचे आगमन होईल असे म्हणणे वावगे नाही.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे