[Marathi] मुंबईत शनिवार व रविवार दरम्यान तीन अंकी पाऊस पडण्याच्या शक्यतेमुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका

August 2, 2019 3:01 PM | Skymet Weather Team

मुंबई मध्ये नेहमीप्रमाणे आठवड्याच्या अखेरीस जोरदार पावसाची शक्यता आहे,आठवड्याच्या इतर दिवशी फारसा पाऊस नसून शुक्रवारी शहरात पावसात वाढ होते तर काही ठिकाणी जोरदार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची समस्या निर्माण होते.

या आठवड्यात मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असून काही तुरळक सरींची नोंद झाली. तथापि काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सांताक्रूझ येथे ४३ मिमी तर कुलाबामध्ये २१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मुंबईकरांची आज सकाळची सुरुवातच ढगाळ वातावरणाने झाली असून लगेच पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून शहरात पाऊस सुरूच असून संपूर्ण दिवसभर पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. सकाळी ८:३० ते ११:३० या तीन तासांतच सांताक्रूझमध्ये ३० मिमी पावसाची नोंद झाली.

दरम्यान मुंबईत आता पावसाळी गतिविधीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी तीन अंकी पावसाची नोंद होऊ शकते.

शिवाय, उद्या आणि परवा पावसाची तीव्रता जास्त असेल आणि बऱ्याच भागांत पाणी साचण्याची तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. खर तर मुंबई शहरात तीन अंकी पाऊस नोंदला जाऊ शकतो. अशा प्रकारे, पुन्हा एकदा मुंबईमध्ये आठवड्याची अखेर पावसाळी असेल.

प्रतिमा क्रेडीट: IBT times India 

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES