Skymet weather

[Marathi] मुंबई मान्सून २०१९: मुंबईत पाऊस सुरु, पावसाचा जोर रात्री पर्यंत वाढण्याची अपेक्षा

June 27, 2019 9:11 PM |

Mumbai-rains

मुंबईत लवकरच जोरदार पावसाची प्रतीक्षा संपून, शहरात चांगल्या पावसाची नोंद करण्यात येणार आहे. हळूहळू तीव्र मेघबंदी मुंबईला व्यापत आहे. आधीच काही भागात जसे सांताक्रूज आणि ठाणे मध्ये पाऊस नोंदवण्यात आलेला आहे. खरं तर, बहुतांश ठिकाणी आधीपासूनच हलका पाऊस अनुभवण्यात येत आहे.

Live-lightning-and-thunderstorm-status-across-India-1

हवामान मॉडेल आधीच मुंबईच्या आसपासच्या भागात ढग दर्शवित आहेत जे आता मुंबईकडे वळत आहेत. हवामानज्ञ आता अंदाज घेत आहेत की सुरूवातीस पाऊस मध्यम असेल परंतु आज रात्री तीव्रता वाढेल.

Click here to checkout the live lightning, thunderstorm and rains across Mumbai

मुंबईत मान्सूनने शेवटी गती घेतली आहे आणि पश्चिम किनारपट्टीवर असलेली ट्रफ व बंगालच्या पूर्व-मध्य खाडीवर उपस्थित चक्रवाती प्रणालीला या पावसाचे श्रेय दिले जाऊ शकते.

स्कायमेट हवामानानुसार, २८ जून रोजी पाऊस तीव्र होईल आणि २९ जून रोजी जोरदार पाऊस पडेल. ३० जूनला कमी होईल परंतु मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहील.

जून महिन्यात शहरात सरासरी पाऊस ४९३.१ मिमी इतका आहे. आतापर्यंत शहरात केवळ १८३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आम्हाला भिती वाटत आहे की आगामी पाऊस मुंबईला केवळ लक्ष्यापर्यंत आणेल परंतु त्यापेक्षाही जास्त, हे कठीण काम असेल.

तथापि, जुलै मध्ये चांगल्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे आणि पाऊस महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांगला जोर पकडेल, असे दिसून येत आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try