मागील काही दिवसापासून मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. खरं तर, ८ जुलैनंतर शहरात कोठेही तीन-अंकी पावसाची नोंद झाली नाही. या आठवड्याच्या अखेरीस काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे, परंतु पाऊस हा त्या भागांपुरताच सिमीत होता.
गेल्या २४ तासांत सोमवार सकाळी ८:३० पासून कुलाबामध्ये ४ मि.मी. पाऊस झाला तर सांताक्रूझ कोरडेच राहिले आहे.
सध्या, कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात असलेल्या चक्रवाती परिभ्रमणामुळे मेघ फक्त समुद्रावरच आहे. यासह, एक ट्रफ रेषा कोकणपासून कर्नाटकपर्यंत विस्तारात आहे.
हवामानतज्ञांच्या मते, हे चक्रवाती परिभ्रमण आणि मेघ किनाऱ्यापासून दूर जातील.तथापि, स्थित असलेल्या ट्रफ रेषेमुळे पुढील २४ तासात शहरातील काही भागात मध्यम पाऊस पडेल व काही तुरळक ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
दरम्यान २६ जुलै पासून मुंबईत पाऊस वेग घेईल आणि त्याच्या तीव्रतेत देखील वाढ होईल. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता असून तीन अंकी पाऊस देखील नोंदला जाऊ शकतो. तसेच आठवड्याच्या अखेरीस सखल भागात पाणी साठून वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवू शकते.
प्रतिमा क्रेडीट: टाइम्स नाओ
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे