गेल्या चोवीस तासांत मुंबईत तुरळक हलक्या सरींची नोंद झाली असून दिवसभर हवामान उबदार होते व रात्र आल्हाददायक.
स्कायमेटच्या अनुसार, तीव्र चक्रीवादळ महा मध्य-पूर्व अरबी समुद्रात आहे. येत्या २४ ते ३६ तासांत ही प्रणाली पश्चिम / वायव्य दिशेने सरकेल आणि त्यानंतर पूर्व / ईशान्य दिशेने दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीकडे वळेल.
या गतिविधींच्या पार्श्वभूमीवर, पुढच्या ४८ तासांत मुंबईत थोड्या प्रमाणात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवस मुख्यतः उबदार असेल व रात्र आल्हाददायक राहील. दिवसाचे तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान तर रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.
दरम्यान ५ नोव्हेंबरच्या सुमारास चक्रीवादळ महा मुंबईच्या उत्तरेजवळ येईल परिणामी शहरात पावसाचा जोर वाढेल. तसेच येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी शहरात मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या काळात मध्यम वारे वाहतील आणि समुद्र देखील उग्र असेल.
ऑक्टोबर महिन्यातच मुंबईत पाऊस ओसरतो आणि नोव्हेंबरमध्ये जवळजवळ नसतोच. मात्र यावर्षी, परिस्थिती वेगळी होती आणि एका पाठोपाठ एक चक्रीवादळांमुळे मुंबईत पाऊस होतच आहे.
Image Credits – Indsamachar
Any information taken from here should be credited to Skymet Weather