काल दिवसभरात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे . तथापि, पावसाची तीव्रता मुख्यत्वे कोकण विभागापर्यंत मर्यादित राहिली आणि बाकी ठिकाणी
पावसाची तीव्रता माञ कमी होती . दरम्यान, राज्यातील इतर भाग म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ प्रामुख्याने कोरडेच राहिले तिथे पावसाची नोंद झाली नाही . गुरुवारी सकाळी ०८.३० पासून,गेल्या 24 तासात, मुंबईत ७ मि.मी. पावसाची नोंद झाली, अलिबाग ५ मि.मी, हर्णे २ मि.मी., वेंगुर्ला २ मि.मी., माथेरान १ मि.मी., रत्नागिरी १ मिमी डहाणू ०. ४ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार कमी दाबाच्या पत्त्यामुळे निर्माण झालेले वारे सध्या पूर्व मध्य प्रदेशाकडून पूर्व विदर्भ ओलांडून तेलंगणाकडे जात आहेत. यामुळे पुढील २४ तासात विदर्भ व मध्य महाराष्ट्र तसेच पुणे येथे ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो .
[yuzo_related]
हे वारे पुढे दक्षिण कोकण ओलांडून केरळच्या दिशेने वाहणार आहेत त्यामुळे येत्या २४ तासात कोकणमधील पाऊस वाढण्याची शक्यता आहे . मुबंई मध्ये सुद्धा पाऊस होऊ शकते . सर्व महाराष्ट्राचे कमाल तापमान ३०अंशाच्या जवळ नोंद होऊ शकते तर सागरी किनारपट्टीकडील तापमान ३० अंशापेक्षा कमी असेल .
हवामानाचा कृषी विभागावर होणारा परीणाम पाहू ;
खरीफ पिकांची तयारी म्हणून शेतकरी बांधवानी माती मशागत ,गादी वाफे यांची तयारी करून ठेवावी ,ढगाळ हवामानामुळे पिक कीड होऊ शकते त्यासाठी विशेष काळजी घ्यावी . वारे जास्त असल्यामुळे पिकांना आधार द्यावा . कोकणातील शेतकरी बांधवानी आंबा बागेला खत घालून रोग असण्याऱ्या फांदया काढून टाकाव्यात.
Image Credit: Wikipedia
Any information taken from here should be credited to skymetweather.com