[Marathi] रात्रीपर्यंत मुंबईत पावसाचा जोर वाढणार,काही जोरदार सरींसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

August 8, 2019 3:57 PM | Skymet Weather Team

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत पाऊस सुरूच असून पावसाचे प्रमाण कधी मध्यम तर कधी जोरदार आहे.

ऑगस्ट महिन्याची सुरूवात जोरदार झाली असून पूर्ण शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती ज्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या चार दिवसात पावसाळी गतिविधीत लक्षणीय घट झाली असून, गेल्या २४ तासात शहरात केवळ १ मिमी पाऊस झाला आहे.

आज देखील दिवसभर, मुंबई आणि उपनगरामध्ये फारशा पावसाची शक्यता नाही. मात्र, आज रात्रीपर्यंत पावसाळी गतिविधीत पुन्हा वाढ दिसेल. त्याचे कारण छत्तीसगड आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा होय.

ही प्रणाली पश्चिम दिशेने सरकत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर-किनारपट्टीसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून ची लाट तीव्र होईल.

म्हणून,आज रात्री मुंबई आणि उपनगरात काही जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. या पावसाळी गतिविधी उद्यापर्यंत सुरू राहतील.

तथापि, हा पाऊस सतत पडणार नसून अधून मधून विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस काही काही ठिकाणीच बरसणार आहे. हा पाऊस ३ ऑगस्ट राजी पडलेल्या पावसाइतका जोरदार नसणार आहे मात्र सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES