[Marathi] मुंबईत पाऊस सुरूच राहणार, चक्रीवादळ वायुचा प्रभाव कायम

June 16, 2019 5:02 PM | Skymet Weather Team

मुंबईत मागील बऱ्याच दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. परवा शहरामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली, परंतु काल काही भागांत केवळ हलका ते मध्यम पाऊस झाला.

मागील २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेने १३ मिमी आणि कुलाबा येथे केवळ ३ मिमी पावसाची नोंद झाली. ह्या पावसाळी गतिविधींचे प्रमुख कारण चक्रीवादळ वायुमुळे वातावरणात आलेली आर्द्रता आहे.

आता मुंबई शहर परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू राहील. शिवाय, गोव्यापासून केरळ पर्यंत एक ट्रफ रेषा विस्तारत आहे ज्यामुळे मुंबई शहरातील आर्द्रता वाढू शकते ज्यामुळे पाऊस होईल.

सध्याच्या हवामानाच्या परिस्थितीबद्दल सांगायचे तर सकाळपासून मुंबई शहरात आज आकाश ढगाळ आहे. ज्यामुळे आजही काही भागात पावसाची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

मॉनसूनचे अद्याप मुंबई शहरात आगमन झालेले नसून अजून किमान सहा दिवसांचा विलंब अपेक्षित आहे. आता, लवकरच मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल आणि काही प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होवू शकते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES