[Marathi] मुंबईत १९ आणि २० ऑक्टोबर रोजी एक दोन जोरदार सरींसह तुरळक पाऊस सुरु राहण्याची शक्यता

October 13, 2019 2:00 PM | Skymet Weather Team

मुंबई शहरात अलीकडेच गडगडाटासह पाऊस झाला असून, तर उत्तरेकडील उपनगरामध्ये काही तीव्र सरी देखील अनुभवण्यात आल्या.

स्कायमेटच्या अनुसार, पुढील दोन ते तीन दिवस शहरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहील व १९ आणि २० ऑक्टोबर रोजी एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे. ह्या पावसाळी गतिविधी बहुधा दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी अनुभवल्या जातील.

या पावसाचे श्रेय पावसाळी ढगांच्या विकसित होण्याला दिले जाऊ शकते. हवामान प्रणालींच्या दृष्टीने दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यालगत चक्रीवादळ अभिसरण असून दक्षिण किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला असल्यामुळे पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान दोन ते तीन दिवसानंतर, शहरात पाऊस कमी होईल व हळूहळू हवामान स्वच्छ होऊ लागेल आणि एकदा पावसाने पाठ फिरवली कि तापमान वाढण्यास सुरवात होईल. आमच्या तज्ञांनुसार तापमान ३६ अंशांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

साधारणत: जेव्हा मान्सून परतीच्या अवस्थेत असतो, तेव्हा देशाच्या बर्‍याच भागात पावसाळी गतिविधी वाढतात आणि सध्याची परिस्थिती अशीच आहे. मान्सूनपूर्व हंगामातही अशीच परिस्थिती दिसून येते ज्यात पावसाळी ढगांच्या विकासामुळे चांगल्या सरी अनुभवल्या जातात.

Image Credits – India TV

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES