मुंबईत जुलै महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली. सुरुवातीच्या दोन दिवसातच, पावसाने जुलै महिन्याची ८४१ मिमी सरासरी पावसाच्या निम्मी मजल मारली. १ ते २ जुलै या कालावधीत एकूण ४६७ मिमी पावसाची नोंद झाली.
१ जुलैपासून आतापर्यंत एकूण ५२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तथापि, ३ जुलैपासून पावसात लक्षणीय घट झाली आहे आणि गेल्या दोन दिवसांत शहरात फक्त मध्यम पाऊस नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान वर्षाच्या या काळात, मुंबई शहर विविध हवामान प्रणालींद्वारे प्रभावित होते. त्यापैकी एक किनारपट्टीलगत असलेली ट्रफ रेषा आहे, जीचा विस्तार काही वेळेस आंशिक राहतो किंवा संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचतो, म्हणजे अगदी कोकण आणि गोवा किनाऱ्यापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत.
सक्रिय मान्सूनच्या उगमास कारणीभूत ठरणारे दुसरे कारण म्हणजे बंगालच्या खाडीतील प्रभावी प्रणालीची उपस्थिती आणि तिसरी मान्सून ट्रफ आहे जी उत्तरपश्चिमेकडे वळते आणि हिमालयाच्या पायथ्याच्या लगत आहे. या सर्व हवामानामुळे मुंबईत जोरदार पाऊस पडतो.
सध्याची हवामानाची परिस्थिती:
सध्या दक्षिण-उत्तर प्रदेशावर एक कमी दाबाचा पट्टा आहे. ही प्रणाली हळूहळू पूर्व दिशेने सरकत आहे. याव्यतिरिक्त, २४ तासांनंतर मान्सून ट्रफ पुढे सरकण्याची शक्यता असून हिमालयच्या पायथ्यापर्यंत येण्याची अपेक्षा आहे.
या प्रणालीच्या प्रभावामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईसह कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान या कालावधीत काही भागात एक दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.
त्यानंतर, एक प्रत्यावर्ती चक्रवाती प्रणाली दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि आसपासच्या हिंद महासागरात तयार होण्याची अपेक्षा असून त्यामुळे विषुववृत्त ओलांडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर कमकुवत होईल. या प्रणालीमुळे, वारे वायव्येकडून वाहतील, ज्यामुळे कोकण आणि गोवासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कमी होईल.
एकूणच, आपण असे म्हणू शकतो कि हा मान्सूनचा एक कमकुवत टप्पा असेल ज्याच्या दरम्यान मुंबई आणि उपनगरांत मोठ्या पावसाची शक्यता नाही. पाऊस केवळ हलका ते मध्यम स्वरूपाचा होईल. या संपूर्ण काळात शहरात २० ते ३० मिमी पाऊस नोंदण्याची अपेक्षा आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे