गेल्या काही दिवसांपासूनमुंबईमध्ये मुसळधारपावसाचा लपंडाव चालू आहे. काही दिवस जोरदार तर काही दिवस हलका पाऊस असे चित्र दिसत आहे.
आठवड्याच्या अखेरीस पावसाने चांगलाच जोर पकडला शहरभर जोरदार सरी कोसळल्या. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे विस्कळीत आणि विलंबित हवाई उड्डाणे,रस्त्यांवर पाणी साचणे तसेच रेल्वे मार्गात पाणी साचल्याने अडकलेल्या रेल्वे गाड्या अशी परिस्थिती होती. तथापि, रविवारी पावसाच्या प्रमाणात घट झाली. सोमवारी शहरापेक्षा उपनगरात पावसाने किंचित जोरदार हजेरी लावली.
गेल्या २४ तासांत रविवार सकाळी ८:३० पासून सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईकरांची सकाळचं ढगाळ वातावरणात उजाडली तर काही ठिकाणी पहाटेपासूनच पाऊस पडत होता.
स्कायमेटच्या हवामानतज्ञांनुसार,मुंबईमध्ये आज ही अधूनमधून विश्रांती घेत पावसाची शक्यता आहे. काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित ठिकाणी पावसाचे स्वरूप हलके ते मध्यम राहील. तथापि, पाणी साचून गदारोळ होईल इतका मुसळधार पाऊस शहरात कोसळणार नाही. ह्या पावसाळी गतिविधी अल्प काळासाठी असून पावसाचे स्वरूप जोरदार नसल्याने पूरसदृश्य परिस्थिती उद्भवणार नाही.
प्रतिमा क्रेडीट: द इंडियन एक्सप्रेस
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे