[Marathi] मुंबईत पाऊस सुरु राहणे अपेक्षित, मॉन्सूनचे आगमन लवकरच

June 14, 2019 12:22 PM | Skymet Weather Team

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची नोंद करण्यात येत आहे. खरं तर, काल, एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस पण पडलेला आहे. पावसाचा जोर मुख्यतः दुपारी व रात्री जास्त राहिलेला आहे.

याशिवाय, मुंबईकरांनी आज सकाळी ढगाळ आकाशासह पावसाचा आनंद घेतला आहे.

गेल्या २४ तासात, सांता करुज मध्ये ०.३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, तर कोळंब मध्ये ६.० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

पावसामुळे हवामान आनंददायी झाले आहेत. याशिवाय, तापमानात देखील लक्षणीय घट नोंदवण्यात आलेली आहे.

मुंबईत चालेल्या पावसाचे कारण आहे महाराष्ट्राच्या जवळ उपस्थित असणारे अतिशय तीव्र चक्रीवादळ वायु. तथापि, ही हवामान प्रणाली आता मुंबई पासून दूर पोहोचून गेली आहे, परंतु, ह्याचे बाह्य परिधीय ढग अजूनही मुंबई शहराला प्रभावित करीत आहेत.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबई शहरात आज आणि उद्या देखील पाऊस पडत राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, विविध तीव्रतेचा पाऊस मॉन्सूनच्या आगमनपर्यंत सुरु राहील, असे दिसून येत आहे. त्या कालावधीत पावसाच्या तीव्रतेत वाढ होतच राहिल, असे म्हणू शकतो.

साधारणपणे, मुंबईत दक्षिण पश्चिम मॉन्सूनचे आगमन १० जून रोजी होतात. परंतु, आता पर्यंत मुंबईकरांना मॉन्सूनच्या आगमनाची वाट बघावी लागत आहे. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे कि आठवड्याच्या शेवट पर्यंत मुंबईत मॉन्सूनचे आगमन होईल. याशिवाय, वाऱ्यानंची दिशा देखील बदलेल व तापमानात एका नंतर एक लक्षणीय घट नोंदवण्यात येईल. मुंबई शहर ढगाळ आकाशासह पाऊस अनुभवतील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES