गेल्या दोन ते तीन दिवसांत मुंबई शहरात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ६ मि.मी. पावसाची नोंद झाली तर कोलाबा येथे 1 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
आता, पुढच्या २४ तासांत आज आणि उद्या मुंबईत पावसाळी क्रिया चालू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, चक्रीवादळ वायुच्या प्रभावाने वाहणारे दक्षिण-पश्चिम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. परिणामी, पावसाची तीव्रता कमी होईल.
Also read: बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता, मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक
अशा प्रकारे, उद्यानंतर पाऊस कमी होईल. तथापि, महाराष्ट्राच्या तटीय भागांवर, २३ जून ते २६ जून दरम्यान मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्या वेळी एक दोन ठिकाणी खूपच जोरदार पाऊस पडू शकतो, ज्यामुळे, त्या कालावधीत पावसामुळे मुंबईकर सावध रहावे.
२१ आणि २२ जून दरम्यान महाराष्ट्रातील अंतर्गत भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
दक्षिण पश्चिम मॉन्सून जे मुंबई शहरावर १० जूनच्या आसपास पोहोचतात, आता एक आठवड्यापेक्षा जास्त काळ विलंबित झाले आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सून २०१९ चे लवकरच मुंबई शहरावर आगमन होईल, असे म्हणू शकतो.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे