गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. जून महिन्यात मुंबईमध्ये ४९३.१ मिलीमीटरच्या तुलनेत ५१६.३ मिलीमीटर म्हणजेच सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
आता, जुलै महिन्याची सुरुवातही पावसाच्या टप्प्यावर सुरु झाली आहे. मध्यरात्रीपासून शहरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. अंधेरी, कुर्ला, बांद्रा, चर्नी रोड, सांताक्रूज, बीकेसी आणि इतर बर्याच भागात तीव्र पाऊस पडला आहे.
गेल्या ६ तासांत, म्हणजेच काल ११:३० पासून ते आज सकाळी ५:३० पर्येंत, सांता करुझ मध्ये ६३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. त्याआधी, काल ११ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.
मुंबईत पाऊस पडत राहणेच अपेक्षित आहे. तथापि पावसाचा जोर किंचित कमी होईल, असे दिसून येत आहे.
३ जुलैच्या रात्रीपासून मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत जोरदार पाऊस शहरातील बऱ्याच भागात अनुभवण्यात येईल.
संपूर्ण जुलै महिन्यात मुंबईत चांगला पाऊस पडेल. जुलै महिन्यात काही तीन अंकी पाऊस अपेक्षित आहे.
उशिरा आगमनानंतरही सक्रिय नैऋत्य मान्सूनमुळे उत्तर कोकण व गोवाच्या भागांत जोरदार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातल्या महाबळेश्वरपर्यंत जोरदार पाऊस होत आहे. गेल्या २४ तासांत डहाणू मध्ये तब्बल २९९ मिमी पावसाची नोंद झाली असून अजूनही पाऊस पडत आहे, त्यामुळे गेल्या २४ तासात डहाणू देशातील सगळ्यात जास्त पावसाळी ठिकाण राहिले आहे. याशिवाय डहाणू मध्ये आगामी दिवसांत जोरदार पावसाची शक्यता असून संपूर्ण महिन्याची पावसाची सरासरी पुढील तीन दिवसांतच गाठली जाण्याची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे