Skymet weather

[Marathi] मुंबईत तुरळक सरी सुरूच राहतील, २९ ऑगस्टपासून मुसळधार पावसाची शक्यता

August 25, 2019 3:59 PM |

MumbaiRains

शनिवारीही मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने मुंबईकरांची पहाट आल्हाददायक झाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात हलका पाऊस पडत आहे. शहरात मागे मुसळधार पाऊस ५ ऑगस्ट रोजी ६२ मिमी इतका पडला होता.

शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून गेल्या २४ तासात शहरात ११ मिमी पाऊस पडला. सकाळपासूनच मुंबई व उपनगरातील काही भागात तुरळक पाऊस सुरू आहे. हवामानतज्ञांच्या मते, या प्रदेशात कोणतेही पावसाळी ढग दिसत नाहीत ज्यामुळे मुसळधार पावसाची अपेक्षा नाही परंतु एक किंवा दोन जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील दोन-तीन दिवस अशीच हवामान परिस्थिती कायम राहील. त्यानंतर, २८ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० ऑगस्टला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या काही सखल भागांत पाणी साचण्याची समस्या उद्भवू शकते.

या पावसामुळे सकाळ व संध्याकाळ आल्हादायक झाली असून दुपार मात्र उबदार व दमट आहे.

मान्सूनच्या चार महिन्यांपैकी दोन महिन्यात यावेळी पावसाने चांगली कामगिरी केली. तथापि, ऑगस्टमध्ये पाऊस तुलनेने कमी झाला असून आता सप्टेंबरमध्ये काय होते हे पाहण्याची प्रतीक्षा करावी लागेल. ऑगस्टमध्ये सामान्य म्हणजे ५८५ मिमी च्या तुलनेत मुंबईत आतापर्यंत ३३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महिना संपण्यासाठी अजून एक आठवडा शिल्लक असला तरी पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता कमीच आहे.

Image Credits – MID-Day

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try