गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईचे हवामान ब-यापैकी कोरडे राहीले आहे. अगदीच गुलाबी थंडी मुंबईला मिळाली नसली तरी उकाड्यापासून सुटका जरूर मिळाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ओखी वादळाचं आगमन झाले आहे. या दिवसांत शक्यतो वातावरणात आर्द्र्ता कमी असते आणि पावसाची शक्यता देखील कमी असते. परंतू ओखी वादळ पावसाच्या काही सरी घेऊन येण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप बेटावरून उत्तरेकडे सरकत असलेल्या ओखी वादळाचा उगम बंगालच्या उपसागरात झाला असून, मुंबईपासून ओखी सध्या ६७० किमी नैऋत्येकडे तर सुरत पासून ८५० किमी नैऋत्य दिशेला आहे.
[yuzo_related]
उत्तरेकडे सरकत असलेल्या ओखीची तीव्रता हळूहळू कमी होत असून गुजरातच्या दक्षिणेकडे आणि उत्तर महाराष्ट्राच्या लगतच्या अरबी समुद्रात संपुष्टात येईल.
ओखी वादळाच्या प्रभावामुळे मुंबई आणि लगतच्या भागात आज संध्याकाळी आणि उद्या मध्यम ते तुरळक पावसाची शक्यता आहे. परवापासून मुंबई आणि लगतच्या भागावरील पावसाचे संकट दूर होऊन वातावरणात थंडावा पसरण्याची शक्यता आहे.
Image credit: wikipedia
येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीकरिता skymetweather.com चा संदर्भ देणे अनिवार्य आहे