Skymet weather

[Marathi] मुंबईत पावसाची हजेरी, आज देखील पावसाची शक्यता

October 22, 2019 11:40 AM |

mumbai weather

गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहरात गडगडाटासह कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. उपनगरामध्ये एक किंवा दोन तीव्र सरींसह हलकी होती.

या पावसाळी गतिविधींचे श्रेय अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राला दिले जाऊ शकते ज्यामुळे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात आर्द्रतेत वाढ झाली आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध पावसाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सांताक्रूझमध्ये २१ तासांच्या कालावधीत १० मिमी पावसाची नोंद झाली.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार आज मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा असून गडगडाटासह एक-दोन मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे.

तथापि, ह्या पावसाळी गतिविधी काळ टिकणाऱ्या नसून २३ आणि २४ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांत केवळ हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २५ ऑक्टोबरच्या आसपास पावसाळी गतिविधी थांबतील आणि हवामान कोरडे होईल, ज्यामुळे तापमानात वाढ होईल. तथापि, तापमानात अचानक वाढ होण्याची अपेक्षा नसून दिवाळीपर्यंत हवामान उबदार पण आल्हाददायक राहणार आहे.

Image Credits – theworldnews.net

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try