[Marathi] कमी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेत वाढीमुळे मुंबईत रविवारी देखील पावसाची शक्यता

October 20, 2019 11:41 AM | Skymet Weather Team

परवाच्या दिवशी मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा आजची सकाळ देखील पावसाने सुरु झाली. पावसाच्या नोंदीनुसार, मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेमध्ये गेल्या २१ तासांत १४ मिमी पाऊस पडला आहे. अरबी समुद्रावर महाराष्टाच्या किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र हे या पावसामागील प्रमुख कारण आहे.

पावसामुळे मागील काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानात निश्चितच घट झाली असून हवामान देखील आल्हाददायक झाले आहे.

शनिवार प्रमाणे आज देखील हा पाऊस सुरू राहणार आहे. एक किंवा दोन तीव्र सरींसह पाऊस बहुधा हलका असेल. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उद्या मात्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर दिशेने सरकल्याने शहरात पावसाचा जोर कमी होईल. तथापि, ढगाळ वातावरण कायम राहील.

साधारणपणे अरबी समुद्रात एखादी हवामान प्रणाली निर्माण झाल्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात मुंबईत जास्त पाऊस अनुभवला जात नाही.

सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव फक्त मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर होत आहे. गेल्या काही दिवसांत या प्रणालीच्या प्रभावामुळे बर्‍याच भागात जोरदार पाऊस झाला आहे.

Image Credits – DNA India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES