[Marathi] मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी राहणार

July 18, 2019 12:18 PM | Skymet Weather Team

मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर कमी राहणार आहे. एक दोन जोरदार सरींची शक्यता आहे पण त्या काही मिनिटांपुरत्याच मर्यादित असतील. तसेच पुढील चार ते पाच दिवसांत पावसाची तीव्रता वाढणार नसून पावसाळी गतिविधी अशाच स्वरूपाची राहील.

गेल्या २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेत ७ मि.मी. तर कुलाबामध्ये ०.२ मि.मी.पावसाची नोंद झाली.

जुलै महिन्याच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने जुलै महिना मुंबईसाठी चांगला ठरला आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये ९१५ मिलीमीटर पाऊस नोंदविला आहे जो ८४०.७ मि.मी.च्या सरासरी मासिक पावसापेक्षा अधिक आहे.

दरम्यान सध्या, मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता नसून पुढील चार ते पाच दिवस शहरात कोणतीही तीव्र पावसाळी गतिविधी दिसणार नाही.

तथापि, २२ आणि २३ जुलैच्या सुमारास पावसाळी गतिविधी वाढणार असून त्या वेळेस मुंबई मध्ये पाऊस पुन्हा जोर धरेल. या काळात, पाऊस मध्यम स्वरुपाचा असेल तसेच कमीतकमी दहा दिवस तरी जोरदार पावसाची शक्यता नाही.

प्रतिमा क्रेडीट: द वैदर चैनल

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES