आधी वर्तविल्याप्रमाणे गुरुवार सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. जरी शहराच्या बऱ्याच भागांत पाऊस पडत असला तरी पावसाची तीव्रता मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाची आहे. स्कायमेटनुसार, आज शहरात थोड्या कालावधीपुरत्या मर्यादित असलेल्या एक ते दोन जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच आकाश देखील ढगाळ राहील.
तथापि, हवामानाची अशी स्थिती कमी कालावधीसाठी असणार आहे कारण सक्रिय मान्सूनमुळे शुक्रवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. आठवड्याच्या अखेरीस शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहराच्या बहुतांश भागांत घनदाट मेघ असतील तसेच पाऊसही पडेल.
हवामानतज्ञांनुसार,२६ जुलै पर्यंत बंगालच्या उत्तर खाडीतील कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकेल आणि एक मजबूत ट्रफ रेषा तयार करेल. याचाच परिणाम म्हणून मुसळधार पाऊस पुन्हा परतेल.
दरम्यान याकाळात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने रहिवाश्यांना प्रवास करण्यास अडचणी येतील.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मागील २४ तासांत गुरुवार सकाळी ८:३० पासून कुलाबा वेधशाळेत ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझमध्ये ३८ मि.मी.पावसाची नोंद झाली.
प्रतिमा क्रेडीट: द इंडियन एक्सप्रेस
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे