[Marathi] मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि पावसाने मुंबईत हजेरी लावली, पाऊस सुरूच राहणार

September 25, 2019 10:24 AM | Skymet Weather Team

काल रात्रीपासून मुंबई शहरात पावसाचा जोर कायम आहे. शहरातील बर्‍याच भागांत पहाटे साडेपाच ते साडेसहा दरम्यान चांगला पाऊस पडला. काही भागांत गडगडाट व विजांचा कडकडाट देखील झाला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस हाइवेवर मुसळधार पावसाची नोंद झाली.

उपलब्ध आकडेवारीनुसार मुंबईच्या काही भागांत आणि बोरिवली व आसपासच्या भागांत काही प्रमाणात पाऊस पडला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३० मिमी पाऊस पडला आहे. पहाटे ३ तासांच्या अवधीत २७ मिमी पाऊस झाला आहे. कुलाबा वेधशाळेत आतापर्यंत तब्बल ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

थेट मेघगर्जनेसह व विजेची स्थिती येथे पहा:

https://www.skymetweather.com//lightning-and-thunderstorm-across-india-live-status/

हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण गुजरातमध्ये चक्रीवादळ परिस्थिती विकसित झाल्यामुळे मुंबई शहरासह कोकण आणि गोवा येथे पुन्हा एकदा मान्सूनची लाट सक्रिय झाली आहे व पावसाचा जोर आणखी वाढणे अपेक्षित आहे.

मुंबई, मुंबई उपनगरात, पालघर, अलिबाग, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, डोंगरी, बोरिवली, गोरेगाव, मुलुंड, पवई, जुहू, दादर, वांद्रे, चेंबूर, कुलाबा, नवी मुंबई, कुर्ला, मीरा भाईंदर आणि ठाणे येथे पुढील ४-६ तासांत तीव्र सरींची शक्यता आहे.

आज आणि उद्या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शहरात काही प्रमाणात मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच, एक किंवा दोन तीव्र सरींची शक्यता नाकारता येत नाही.

काही सखल भागांत पाणी साचण्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि ढगाळ आकाशासह मुंबईकरांना दमट हवामानापासून काही काळ सुटका मिळायची शक्यता आहे. यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल, परंतु एक दोन ठिकाणी पाऊस सुरु राहील.

यापूर्वी मुंबईत १९ आणि २१ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडला होता. तेव्हापासून शहरावर केवळ हलका पाऊस पडत होता.

Image Credits – Click Now 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES