गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या अनुपस्थितीमुळे मुंबईत वातावरण उष्ण होते. दरम्यान बुधवारी सकाळी मुंबईत मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यामुळे दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीस पूर्णविराम मिळाला असे म्हणणे वावगे नाही होणार.
[yuzo_related]
किंबहुना, मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या सरी देखील सुरु आहेत. ढगाळ आकाश आणि रिमझिम पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून नक्कीच दिलासा मिळाला आहे. मागील वेळी दोन महिने अगोदर म्हणजेच १६ मार्च रोजी मुंबईकरांनी पाऊस अनुभवला होता.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, वातावरण ढगाळ राहणे अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात किंचित घट होईल व तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. शहर परिसरात ढगाळ वातावरण व पावसाळी गतीविधी अनुभवण्यात येत आहे ज्याचे प्रमुख कारण उत्तर कोकण व गोवा येथे विकसित झालेले कमी दाबाचे क्षेत्र आहे.
तथापि, विकसित झालेले कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत असून फार काळ टिकणार नाही. त्यामुळे अंशतः ढगाळ वातावरणाची परिस्थिती अपेक्षित आहे परंतु हवामान लवकरच स्वच्छ होईल. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा मॉन्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ञांच्या अनुसार, २८ आणि २९ मेच्या आसपास मॉन्सूनपूर्व पावसाळी गतीविधीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्या काळात, मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिमोत्तर आर्द्र वाऱ्यांच्या जोर वाढण्याची शक्यता असून मॉन्सून देखील केरळ मध्ये दाखल होणे अपेक्षित आहे.
या दोन्ही कारणांमुळे पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनपूर्व पावसाळी गतीविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे, येत्या काही दिवसांत उष्ण तापमानाची परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या, कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस आहे जे ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येवू शकते. दरम्यान, किमान तापमानात मात्र किरकोळ बदल अपेक्षित आहेत.
येथून घेतलेली कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे